Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 

सीझर माझं कराल तर...!

August 21, 2017

सिझर माझं कराल तर...!!!!

डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई

मो.क्र. ९८२२०१०३४९

बाकी सोशल मिडीयात लोकसीझरच्या वाढत्या प्रमाणाबद्दल काहीही बोलू देत, लिहू देत, पण डॉक्टर नको म्हणतअसतानाही, ‘डॉक्टर, माझं सीझरच करा’ अश्याही मिनत्या वाढत चालल्या आहेत हे खरं.

शिक्षण संपता संपता,उद्योग-नोकरीत स्थिरावता स्थिरावता, लग्नालाच उशीर झालेला असतो. पुढे हनीमून आणिनव्याची नवलाई एन्जॉय करायला म्हणून काही दिवस प्लॅनिंग झालेलं असतं. झालंच मूल,तर सांभाळणार कोण? दोघंही नोकरी करणारे. दोन्ही सासवाही रिकाम्या नाहीत. सासरेरिकामे असले तरी अशा कामाचे नाहीत. अशी सगळी परिस्थिती असते. त्यात दिवस राहायलाउशीर झालेला असतो, कधी कधी तर मोठ्या मुश्कीलीनी प्रेग्नन्सी साध्य होते. मग हेनवसाचं बाळंतपण सुरळीत होणं हे अगदी गरजेचं. सगळ्यांच्या रजा, सुट्ट्या, वेळा,सोयी हे बघून बाळानी जन्म घेणं अवघड. एवढं ते थोडंच समजूतदार असतं? तेंव्हा आपणचवेळ निवडलेली बरी. लोकांना आता अनिश्चिता सोसत नाही. तहान लागण्याआधी विहीरच काय,पण नळ जोडून वॉटर फिल्टरही तयार असतो आता. मग अशा मिनत्या सुरु होतात.

डिलिव्हरीच्या वेदना ही एकमोठी भीती असते. दुखतं खरच खूप. प्रचंड दुखतं. आयुष्यातला सगळ्यात वेदनादायी अनुभव.याची तुलना असह्य दातदुखी किंवा शरीरभर पसरलेल्या कॅन्सरची वेदना अशाशीच होऊ शकते.हे दुखणं कुणालाही नको असतं आता. सीझरचं प्रमाण वाढण्यामागे समाजाची ही कमी झालेलीसहनशक्ती हे ही एक कारण आहे. कित्येक बायका तर नवऱ्याला आधीच पटवून ठेवतात, ‘मलादुखायला लागलं, की तू लगेचच सीझरचा आग्रह धर. कारण आई, सासूबाई कुण्णी कुण्णी माझंऐकणार नाहीत.’ मग अशा मिनत्या सुरु होतात.

खरंतर वेदनारहित प्रसूतीशक्य आहे. पण कोणी सहसा या भानगडीत पडत नाही. हे तंत्र जाणणारे डॉक्टर मुळात कमीआहेत. याचा खर्चही बराच आहे. शिवाय इतकं करूनही ऐन वेळी सीझर लागू शकतं ते शकतंच.त्याबद्दल कुणी काही सांगू शकत नाही. वेदना शमन तंत्रात त्या स्त्रीची बाळ बाहेरढकलण्याची क्षमता मार खाते. त्यामुळे प्रसूती चिमटा लावून अथवा वाटी लावून करावीलागते. याचेही काही प्रॉब्लेम्स असतात. थोडक्यात, धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय अशी या तंत्राची अवस्था आहे.शिवाय समाजाची मानसिकता अशी आहे की; ‘काहीही बिन कष्टानी मिळालं की त्याची किंमतरहात नाही. तेंव्हा बाळसुद्धा जरा दुखून-खुपून झालं की आईला त्याची किंमत कळते. मगचती नीट काळजी घेते!’, असा प्रवाद आहे.

कुठल्याही प्रकारची जोखीमकुणालाही नको असते. दिवस वर गेलेले असताना, पाणी जेमतेम असताना, आधीचं सीझरअसताना, जुळी असताना, बाळाचं वजन किंवा वय किंवा दोन्हीही भरत नसताना, नैसर्गिकप्रसूती होऊ देणे हे जोखमीचं असतंच असतं. कित्येकदा डॉक्टरांसाठी हे असलं बाळंतपण,सीझरपेक्षा जास्त कौशल्याचं असतं. असा प्रयत्न करणं म्हणजे दोरीवरून चालण्यासारखंआहे. कधी तोल जाईल ते सांगता येत नाही. सीझर करा म्हणावं तर अनावश्यक सीझरचा आरोपहोतो. काही प्रॉब्लेम झाल्यावर, ऐन वेळी करा म्हणावं तर, ‘आधीच का नाही केलं?’ असाशहाजोग प्रश्न येतो. वास्तविक डॉक्टरचं काम केवळ सल्ला देण्याचं आहे. निर्णयघेण्याची जबाबदारी त्या त्या पेशंटची आहे. हे वैद्यकीचं एक महत्वाचं तत्व आहे.व्यवहारात असं होत नाही. ‘आता तुमच्याकडे आणून टाकलंय डॉक्टर, आता तुम्हीच काय ते बघा’,असा सोयीचा आग्रह असतो. निर्णय घेण्याची आणि त्याच्या भल्याबुऱ्या परिणामांचीजबाबदारी स्वतः स्वीकारण्याची मानसिकता अजिबात असत नाही. बरेचदा यातल्या जोखमीची कल्पना नातेवाईक करू शकत नाहीत. तो त्यांचा प्रांत नसतो. अशा अति-जोखमीच्याबाळंतपणात इतका वेळ आणि इतक्या काळजीपूर्वक आईकडे आणि बाळाकडे लक्ष द्यावं लागतं,की ते छोटया दवाखान्याच्या ताकदी बाहेरचं असतं. डिलिव्हरीला कधी चार तास लागतील तरकधी चोवीस. इतका वेळ पेशंटच्या उशा पायथ्याशी थांबायला तिथे कुणाला शक्य नसतं आणितेवढं मनुष्यबळही नसतं. इतकं करूनही शेवटी आउटकम् महत्वाचा. आई किंवा बाळाला कोणत्याहीकारणानी काहीही त्रास झाला तर कोणी समजावून घेण्याच्या मनःस्थितीत नसतं. प्रामाणिकप्रयत्नांचं कौतुक विसराच, थेट खळ्ळख्टॅक!! जोखीम स्वीकारण्यात निव्वळ मोठ्या बक्षिसाचीआशा धरून कसं चालेल? नुकसानीचीही शक्यता असते. हे मान्यच नसतं कुणाला. प्रत्येकाला१००% ग्यारंटीशीर रिझल्ट हवा असतो. टिकल्या, पिना, क्लिपा विकणाऱ्या दुकानात पाटीअसते, ‘फैशनकी इस दुनिया में ग्यारंटीकी अपेक्षा न करें’. इथे तर कितीतरी अज्ञातघटक. तेंव्हा अपेशाची थोडीफार शक्यता गृहित धरायला हवी. नॉर्मलचा प्रयत्न करतानात्यातले धोकेच फक्त वजा करा, असं नाही करता येत. इथे समाज वाल्याच्या बायकोच्याभूमिकेत असतो. वाल्याच्या उद्योगातला सुखाचा वाटा सर्वांना हवा असतो त्यातली जोखीमआणि वाईटाचा धनी तो एकटा. मग अशा वेळी तारेवरून चालण्यापेक्षा थेट सीझरचा सल्लादिला जातो.

सीझरमधेही धोके असतात की. भूलदेण्यात, ऑपरेशन करण्यात, ती जखम... नंतरची विश्रांती... पण आज वैद्यकीच्या प्रचंडप्रगतीमुळे हे धोके खूप खूप कमी झाले आहेत. पूर्वी अगदी आईचे प्राण कंठाशी आले कीमगच सीझरचा निर्णय घेतला जायचा. कारण सीझर करण्यामुळेही प्राण कंठाशीच यायचे. आतातसं नाही. भुलीची पद्धत पूर्वीपेक्षा खूप सुधारली आहे. ऑपरेशनचं तंत्रही बदललंआहे.

आणखी एक घटक आहे. कमीवजनाच्या, कमी दिवसाच्या बाळाची काळजी घेण्याचं शास्त्र आता आरपार बदललं आहे. अगदी६००-७०० ग्रॅम वजनाची बाळंही जगवता येतात. जगवली जातात. अशी कामगिरी ही आतावैद्यकविश्वात तरी ‘बातमी’ राहिलेली नाही. पूर्वी असं नव्हतं. १५००-१८०० ग्रॅमचंबाळही जगणं मुश्कील अशी स्थिती होती. मग असल्या बाळांच्या, आयांची सीझरही होतनव्हती. त्यांची बाळंतपणं ‘नॉर्मल’च व्हायची. बाळ जगलं तर आपलं, नाही तर देवाचं.बाळं नॉर्मल होत होती, गुदमरत होती, तडफडत होती, मरत होती किंवा अर्धमेली जगतहोती. तक्रारीचा प्रश्नच नव्हता. ‘जाउ दे, नव्हतं आपल्या नशिबी’, असं म्हणून लोकंपुढच्या बाळंतपणाच्या तयारीला लागत होती. आता असं कोणी करत नाही.

बाळ झालं की पाचव्या दिवशी पूजाकरायची प्रथा निर्माण झाली. हा फार महत्वाचा दिवस. पाचव्या दिवशी सटवाई येते आणिबाळाच्या भाळावर भविष्य लिहून जाते. ही प्रथा आपल्या समाजात कशी बरं रुजली असेल? जरसटवाई पाचव्या दिवशी भविष्य लिहीते, तर पहिले पाच दिवस काय होतं? उघडच आहे, पहिलेपाच दिवस बाळाला मुळी भविष्यच नसतं!थोडक्यात ही प्रथा अशा एका समाजात निर्माण झाली आहे जिथे पहिले पाच दिवस त्या बाळाचंभविष्य त्या समाजाच्या देवदेवतांना सुद्धा सांगता यायचं नाही. या समाजात नवजातअर्भकं पटापट मरत असणार. या समाजानं मुळी मान्यच केलं होतं की पाचच्या पुढे जगलं, तगलं,तरच ते मूल आपलं, अन्यथा नाही.

बाळ अशक्त (SGA), आजारी (Sick), उपाशी (Hypoglycemic), कुपोषित (IUGR), सव्यंग (Anomalous), गुदमरलेलं (Hypoxic-Acidotic) असं असेल तर आता बऱ्याचवेळा आधीच समजतं. ही सारी रंगीत सोनोग्राफीची किमया. पूर्वी ह्या साऱ्यांच निदान बाळ जन्मल्यानंतरव्हायचं. ह्या भानगडीत बरीचशी तान्ही योग्य निदान-उपचारपूर्वी मरायची.

मुळातच तोळा मासा प्रकृतीअसलेल्या अशा बाळाला बाळंतपण सोसत नाही, सबब सीझर करावं लागतं. तुम्हाला हे वाचूनआश्चर्य वाटेल पण आईला जशा बाळंतपणाच्या वेणा सहन कराव्या लागतात तशा त्या बाळालाहीसहन कराव्या लागतात. प्रत्येक कळेवेळी, गर्भपिशवीचा रक्तपुरवठा काही काळ कमी होतो.जे मिळेल तेवढ्यात बाळाला भागवावं लागतं. धडधाकट बाळांना हे जमतं. आजारी बाळांनाहे खूप धोक्याचं ठरतं. याचाही विचार करावा लागतो. यामुळेही सीझरचं प्रमाण वाढलंआहे.

उत्तम भूल, उत्तम शल्यतंत्रआणि उत्तम नवजात आरोग्य सेवा यांच्या परिणामी सीझरचं प्रमाण वाढलं आहे.

याचा अर्थ प्रत्येक पेशंटचंसिझरच करावं लागेल असा नाही किंवा केलेलं प्रत्येक सीझर हे आवश्यकच होतं असाहीनाही. एखाद्या तातडीनं केल्या जाणाऱ्या जीवरक्षक ऑपरेशनची निकड होती का नाही, हेआपण लांबून काय सांगणार? हे तज्ञांचंच काम. कोणत्याही मोठया दवाखान्यात सीझरचं ‘ऑडीट’होत असतं. म्हणजे वेळोवेळी झालेले निर्णय हे योग्य निकष वापरून, पूर्वनिश्चितप्रॉटोकॉल वापरून झालेत की नाहीत हे तपासलं जातं. यानुसार निर्णय असेल तर तो योग्यमानला जातो. अशी व्यवस्था अधिक व्यापक प्रमाणात अंमलात आणली तर यावर काही तरीअंकुश राहील. अन्यथा पेशंट आणि डॉक्टर एकमेकाला दोष तेवढे देत बसतील. केलं, तर ‘काकेलं?’ आणि नाही केलं तर, ‘का नाही केलं?’ अशी सरबत्ती चालू राहील; आणि वातावरण बिघडण्याशिवाय काहीही निष्पन्नहोणार नाही.

शेवटी सीझरच्या एकाजगावेगळ्या फायद्याबद्दल सांगतो आणि थांबतो. मानवी मेंदू हा मानवाच्याउत्क्रांतीचा वाहक ठरला आहे. अंगी शक्ती नसताना जगण्याच्या स्पर्धेत इतरप्राण्यांच्या मागे टाकत मनुष्यप्राण्याने जग पादाक्रांत केलं ते युक्तीच्याबळावर, मेंदूच्या बळावर. मेंदूचा आकार हा डोक्याच्या आकारावर अवलंबून आहे... आणिडोक्याचा आकार हा आईच्या कटीच्या आकारावर अवलंबून आहे. आपोआप, निसर्गतः प्रसूतव्हायचं तर बाळाचं डोकं मोठं असून भागणार नाही. प्रसूती होणार नाही. ती बाई अडेलआणि मरेल आणि तिचा वंशच्छेद होईल. हा निसर्ग नियम. त्यामुळे ठराविक मापापेक्षाजास्त मोठ्या डोक्याची संतती निपजू शकत नाही. मानवी डोक्याच्या (आणि मेंदूच्याही)आकाराला ही नैसर्गिक मर्यादा आहे. आईचा कटीभागही फार विस्तारू शकत नाही. शेवटी दोनपायावर तोल सांभाळायचा तर कंबर अति रुंद असून चालणार नाही.

आता सीझरचा शोध लागला आहे.आता सीझरच सीझर होताहेत. मोठया मोठया डोक्याची बाळं आणि त्यांच्या आया जगताहेत.निसर्गनियमा विरुद्ध जगताहेत. अशांची संततीही अधिकाधिक मोठया डोक्याची असणार आहे.परिणामी मेंदूला कवटीत अधिकाधिक जागा मिळणार आहे, परिणामी माणूस अधिकाधिकबुद्धिमान होणार आहे...!!!??? सीझरची भलावण करणारा किंवा त्याचे दूरगामी परिणामअसेही असतील असं सांगणारा हा ही एक युक्तीवाद आहे.

डॉ. शंतनू अभ्यंकर

मो.क्र. 9822010349

या आणि अशाच अन्यलिखाणासाठी माझा ब्लॉग जरूर वाचा

<shantanuabhyankar.blogspot.in>

Shantanu Abhyankar's Blog

Blog Stats
  • 603 hits