Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
July 25, 2017
Visits : 505

व्यंगोबानाथाची कहाणी. डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई     ऐका व्यंगोबानाथा तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे दोन शेजारणी रहात होत्या. एकीचं नाव सुलाबाई तर दुसरीचं भुलाबाई. दोघीही सख्ख्या मैतरिणी. एके वर्षी काय झालं, दोघी गरत्या राहिल्या. नवमासानी दोघीही प्रसवल्या. दोघींच्याही घरी आनंदी आनंद झाला. साऱ्यांनी पेढे वाटले. पण हाय रे दैवा! काय हे दुर्दैव!! थोड्याच वेळात साऱ्या आनंदावर विरजण पडले. दोघींच्याही मुलांना पाठीवर आवाळू होते. आवळ्याएवढे लिबलिबीत आवाळू. मणके मुळी जुळलेलेच नव्हते. बाळाचे पायRead More

July 16, 2017
Visits : 2007

बागुलबुवाडॉ.शंतनू अभ्यंकर, वाई. मो.क्र.९८२२० १०३४९ स्त्री-पुरुष समानतेचा नारादेत, प्रचंड गाजावाजा करत भरलेली एक आंतरराष्ट्रीय परिषद होती तिथे. ‘डॉक्टरांच्यानजरेतून समाजातील लिंगभेद’ असा काहीतरी विषय होता माझा. पंचतारांकित थंडीत मी माझंबोलणं उरकलं, हुकमी टाळ्या घेतल्या आणि उपस्थितांचे अभिवादन स्विकारत, क्षणभराचासेलिब्रिटी स्टेट्स सांभाळत मी कॉफीच्या स्टॉलकडे गेलो. पुढचा कार्यक्रम एल.जी.बी.टी.(समलैंगिक इ.) आणि त्यांचे प्रश्न असा काही तरी होता. माझ्या इंटरेस्टचा अजिबातचनव्हता. आता मी बनचुका वक्ता झालो आहे. जायRead More

July 04, 2017
Visits : 908

चुकवू नये असं काही... डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई. मो. क्र. ९८२२०१०३४९   आजकाल दिवस राहीले रे राहीले, की हातभर तपासण्या ह्या ठरलेल्याच. ही यादी बघूनच सासूबाई इत्यादी माणसं सवयीनं हतबुद्ध होतात, त्याचे पैसे ऐकून माना टाकतात आणि ‘आमच्या काळी एवढ्या पैशात आख्खं बाळंतपण’ झाल्याच्या कथा सांगतात. सासुबाईंच्या या तक्रारीला अनेक छटा असतात. कधी अत्याधुनिक तपासण्यांविषयी कौतुक, आदर आणि आश्चर्य असतं तर कधी ही लुटारूगिरी नाही कशावरून असा अभिनिवेश. कधी कधी तर  आपल्यावेळी आपल्याला ह्यातलं काही वाट्याला आलं नRead More

Shantanu Abhyankar's Blog

Blog Stats
  • 3420 hits