Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
March 30, 2016
Visits : 981

पुरुष, नसबंदी, कुटुंब आणि कल्याण डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई, सातारा. खरंतर पुरुष नसबंदीमध्येच कुटुंबाचं कल्याण आहे. आपल्याकडे कुटुंबनियोजन म्हणजे ‘बायकांचे ऑपरेशन’ अशी आधुनिक अंधश्रध्दा पसरलेली आहे; आणि पुरुष नसबंदी ही एक बदनाम शस्त्रक्रिया आहे. आणीबाणीत झालेल्या जोर जबरदस्तीमुळे, नेते, नोकरशहा या शस्त्रक्रियेचं नावंही जरा जपूनच घेतात. मात्र शास्त्रीयदृष्ट्या विचार केला तर पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया ही स्त्री नसबंदी शस्त्रक्रियेपेक्षा प्रत्येक बाबतीत सरस आहे. पुरूषांतही आता बिनटाक्याची शस्त्रक्रियRead More

March 20, 2016
Visits : 6305

गप्पातली माणसं डॉ.शंतनू अभ्यंकर, वाई.   मंगल कार्यालयातली, आतली हवाबंद खोली असते. पंखा कुरकुरत काम केल्या सारखं करत असतो. घामेजलेली दुपार असते, पंगती  नुकत्याच उठलेल्या असतात. सतरंजीवर लोड, तक्के, उशा, गादया, पांघरूणं, अस्ताव्यस्त पसरलेली असतात. अक्षता, गजऱ्यातून ओघळलेली फुलं, पेढ्याचे कागद, पानाची देठं, लाडू-चिवड्याचा चुरा अशी कशाकशाची वर  पखरण असते. त्यातच मंडळी; नाना, नानी, आत्या, मामा, माम्या, मावश्या, अण्णा, अप्पा, तात्या, दादा, अंग मुडपून, भींतीला पाठ टेकून गिचमिडाटात बसलेले असतात. पोरं,Read More

March 02, 2016
Visits : 5918

संपेल का कधीही, हा खेळ बावळ्यांचा? डॉ.शंतनू अभ्यंकर, मॉडर्न क्लिनिक, वाई, जि.सातारा. ४१२ ८०३. आता सुरु होतील फोन वर फोन, आयांचे लेकींना, सास्वांचे सुनांना, जावांचे नणंदांना वगैरे, वगैरे.. फोन असतील मुख्यत्वे शुभेच्छांचे, आपलेपणानी, आठवणीनी, वेळात वेळ काढून केलेले. सगळ्यांचा मतीतार्थ एकच, ‘जप गं बाई, या दिवसात...त्या अमकीचं तमकं झालं...ऐकलस ना...; सगळं सुखरूप पार पडलं की मी सुटले...आणि तू ही!!...कारण रात्र वैऱ्याची आहे. अमावस्या/पोर्णिमा आलीच आहे आणि या वेळी ग्रहण आहे. ग्रहण पाळलं नाही तर कायRead More

Shantanu Abhyankar's Blog

Blog Stats
  • 13204 hits