Updated:
Subscribe News Letter Invite Friends

 
February 29, 2016
Visits : 12176

करायला गेलो एक.डॉ. शंतनू अभ्यंकरमोबाईल ९८२२० १०३४९लिंगगुणोत्तर ढळढळीतपणे ढळत असताना सरकारने निव्वळ बघ्याची भूमिका घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने कानपिचक्या दिल्या आणि कायद्याच्या अंमलाला गती आली. पण आता प्रशासनाला आणि स्त्रीवाद्यांना कायद्याचा अंमल चढला असं म्हणायची पाळी आली. या कायद्याच्या अतिरेकी आणि चुकीच्या अंमलबजावणीमुळे स्त्रियांना मूलतः असलेल्या गर्भपाताच्या हक्कावरच गदा येते आहे. स्त्रियांविषयक अनेक अभ्यासातून हे आता दिसून आलं आहे.उठसूट प्रत्येक गर्भपात म्हणजे स्त्रीभृणहत्याच आहे असं गृहीत धरून काRead More

February 29, 2016
Visits : 1708

पपी लव्हडॉ. शंतनू अभ्यंकर, वाई, जि.सातारा ४१२ ८०३मोबाईल क्र. ९८२२० १०३४९पपी लव्ह म्हणजे कोवळ्या  वयातलं प्रेम. याला म्हणतात क्रश. अगदी पहिलंवाहीलं प्रेम. ‘परकर चोळी मधली पोर, झर्रकन् झाली फूल टपोर’, अशा वेळचं झर्रकन् झालेलं हे प्रेमाच्या गावा जाणं. एखादी कविता, सिनेमातला एखादा प्रसंग, एखादं गाणं हे कॅटॅलीस्ट म्हणून काम करतात; आणि मग घडतं, हे नखशिखांत प्रेमात पडणं. ह्याला काहीही बंधन नसतं, कसलीही   मर्यादा नसते. आकंठ प्रेमात बुडून, आकंठ तृप्ततेची वाट बघणं हे ह्या प्रेमाचं लक्षण. अगदी चौदाव्या सोळाव्या वर्षीRead More

February 29, 2016
Visits : 5452

च्यायला                       डॉ.शंतनू अभ्यंकर, मॉडर्न क्लिनिक,वाई.  मोबा: ९८२२० १०३४९                लखनौच्या झगमगाटातून टॅक्सी बाहेर आली आणि एका आडमाप स्पीड ब्रेकरवर गचका खाऊन एका एकलकोंडया रस्त्याला लागली. लखनवी मेहमानवाजीची तारीफ ऐकून असलो, तरी उत्तरप्रदेश म्हणजे अनागोंदी हे समीकरण मनात होतच. टॅक्सीवाला आपल्याला फिरवत तर नाही ना, या विचारात रस्त्यावरच्या खुणा मी मनात बिंबवण्याच्या प्रयत्नात होतो. इतक्यात पाटी दिसली; रायबरेली ५८ कि.मी. मग इंदिराबाई आणि त्यांची कारकीर्द आठवत असताना टॅक्सी उजवीकडे वळली आणिRead More

February 23, 2016
Visits : 5528

गर्भसंस्कार का पालक मार्गदर्शन मेळावा? डॉ. शंतनू अभ्यंकर, वाई, जि.सातारा. ४१२ ८०३. मी आहे गायनॅकोलॉजिस्ट, प्रॅक्टिस करतो एका लहान गावात. गेली वीस वर्ष मी नियमितपणे माझ्या पेशंट साठी 'पालक मार्गदर्शन मेळावा' घेतो आहे. होणारे आई - बाबा आणि त्यांचे कुटुंबीय या सगळ्यांना या प्रबोधनात्मक कार्यक्रमाला आमंत्रण असतं. प्रत्येकवेळी प्रतिसाद अगदी छान असतो. इतकी वर्ष झाली, मी कटाक्षानी ‘गर्भसंस्कार’ हा शब्द टाळत आलोय. या मागे असणाऱ्या धार्मिक, अशास्त्रीय, छद्मशास्त्रीय गोष्टींना माझा ठाम विरोध आहे.Read More

February 09, 2016
Visits : 4393

स्त्रीभ्रूणहत्या, किंवा खरंतर लिंग निवड हा प्रश्न व्यामिश्र आहे आणि त्याला उपायही अनेक प्रकारचे असणार. पैकी मला महत्वाच्या वाटणाऱ्या उपायांबद्दल थोडक्यात सांगतो... स्त्रियांचे सक्षमीकरण हा खरा, दूरगामी आणि कायमचा उपाय. लोकशिक्षण, सुकन्या समृद्धी योजना, समान नागरी कायदा, स्त्रियांना झुकतं माप देणारे कायदे, जन्मनोंदीवर आईचं नाव, कुटुंबाच्या इस्टेटीत न्याय्य वारसाहक्क हे आणि असे सारे उपाय यासंबंधी आहेत. गर्भलिंगनिदान कायदा हा तात्काळ करण्यासारखा पण निश्चितच तात्कालिक उपाय आहे. प्रत्येक कायद्याचRead More

February 04, 2016
Visits : 7339

सय्यद गलाहडॉ. शंतनू अभ्यंकर, वाई.कोण कुठला सय्यद गलाह, अचानक माझ्याच वर्गात माझ्याच बॅचला दाखल होतो काय आणि चांगला मित्र बनतो काय, सारंच जरा वेगळं घडलं. ...आणि आता रोज बातम्या येतात युद्धाच्या, निर्वासितांच्या, छळ छावण्यांच्या, क्रांतीच्या आणि प्रतिक्रांतीच्या. रोज टी.व्ही.वर चित्र झळकतात, वर्तमानपत्रात मोठे मोठे फोटो येतात; युद्धात मेलेल्यांचे, मारणाऱ्यांचे, मरायला टेकलेल्यांचे, मरायला तयार असणाऱ्यांचे आणि मारण्यासाठी लायनीत उभे केलेले जीव सगळे. असं रोजच छापून येतं म्हटल्यावर रोजच मला सय्यदची आठवण येते. तोRead More

Shantanu Abhyankar's Blog

Blog Stats
  • 36596 hits